कारगिल विजय दिवस रजत महोत्सवा निमित्ताने

उद्या शहरातून निघणार सैनिकांची मोटर सायकल रॅली, शहीदांच्या परिवाराचा करणार सत्कार

अकोला. देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था अकोला व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने उद्या २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली आणि मानवंदना देऊन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ सुगत वाघमारे व देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थाध्यक्ष मेजर मनोहर चव्हाण, देवळी येथील सरपंच सौ कोमल दिपक पातोंड,यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून मोटर सायकल रॅली प्रारंभ होऊन इन्कम टॅक्स मार्गे सहकार नगर, शिवापूर मार्गे आळंदा फाटा येथे राजयोग मंगल कांर्यालयात रॅली चा समारोप करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व विरशहीद जवनांचा परिवार, ज्यामध्ये विर माता, विर पिता,वीर पत्नी, वीर पुत्र, अश्या परिवाराचा सत्कार करण्यात येणार आहे,त्यानंतर देशभक्ती गीत गायनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मेजर मनोहर गोकुळ चव्हाण यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली.

देशात गेल्या २५ वर्षेपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला त्या विजयाचा रजत महोत्सव असून जिल्हातील सर्व आजी माजी सैनिक, त्यांचे नातेवाईक, देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार,देशाभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोहर चव्हाण, सचिव श्रीकृष्ण आखरे, उपाध्यक्ष सुभेदार मेजर अर्जुन बुधनेर, कोषध्यक्ष मेजर किशन राठोड, दीपक पातोंड आदींनी केले आहे

शहीदांची आठवण फक्त सैनिकांनाच कां? नागरिकांना कां नाही ?
देशप्रेम व्यक्त फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि दुर्दैवाने जवान शहीद झाल्यानंतरच आठवले जाते. देशात गेल्या २५ वर्षेपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला.त्या विजयाचा रजत महोत्सव २६ जुलै ला असून हा महोत्सव केवळ सैनिकांना करावा लागतो ही शोकांतिका आहे. अशी खंत ही त्यांनी आज व्यक्त केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW