मा.खा.श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री. अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांना 30 अकोला पश्चिम मतदार संघातील अवैध रित्या अफगाण, बांगलादेशी नागरिकांचे मतदान कार्ड व राशन कार्ड ची नोंदणी धारकावर कारवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले.
अकोला महानगरात अकोला पश्चिम मतदार संघातील अकोट फैल, सोळाशे प्लॉट, नायगांव, इराणी वसाहत, सिलोडा तसेच वाशीम बायपास, खदान परिसर या भागात बाळापुर व बार्शीटाकळी भागातील मतदार यांनी बोगस मतदान करण्याकरिता आपल्या नांवाची नोंदणी करून घेतली आहे तसेच या भागात बांगलादेशी तसेच अफगाणी नागरिकांचे मतदान कार्ड व राशन कार्ड हे अवैध रित्या तयार करण्यात आले आहेत. या संबधीची तक्रार रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे नोंदण्यात आली आहे.
वरील भागातील नवीन मतदार नोंदणी झालेले अर्ज व मंजूर झालेले राशन कार्ड यांचे पुन्हा निरीक्षण करून अवैध मतदार कार्ड व राशन कार्ड हे त्वरीत रद्द करण्यात यावे व संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री. संजय गोटफोडे, अँड देवाशिष काकड, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, पवन महल्ले, मनोज साहू, नितीन राउत, बल्लू चौधरी, प्रकाश घोगलीया, कपिल बुंदेले आदी पदाधिकारी उपस्थित होते.