बहुचर्चित भरतीया घरफोडी प्रकरण अखेर ७८ दिवसांचे अथक परिश्रम मुख्य सुत्रधार बिहार राज्यातुन अटक गुन्हयातील बहुमुल्य हि-याचे नेकलेस सह अं. २५,००,०००/-रू चा मुददेमाल हस्तगत. मुद्देमालसह घरफोडीतील हत्यार / कटर आरोपी कडुन प्रयागराज मधुन जप्त.
दि.०४/०५/२०२४ रोजी पो.स्टे. खदान येथील अप क ३८५/२४ कलम ४५७, ३८० भा. दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे. सदर गुन्हयातील घरफोडी मध्ये सोने, चांदी तसेच रोख असा एकुण ४३,७७, ३१७ रूपयाची चोरी झाली होती. सदर गुन्हयाच्या घटनास्थळी मा. पोलिस अधिक्षक सा. अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देवुन सदर गुन्हयात उघडकीस आणनेकामी आदेशीत करून सुचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगीतले.
त्याअनुषंगाने पो.नि.शंकर शेळके, पोउपनि आशिष शिंदे व स्था.गु.शा. येथील यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचा परीसराची पाहणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गोपनिय माहितीचे आधारे गुन्हया घडल्या नंतर ४८ तासाचे आत स्थागुशा पथकाने आरोपी निष्पन्न करून अहमदनगर जिल्हयातुन आरोपी क १) जिगर कमलाकर पिंपळे वय ३७ वर्ष रा. पाखोरा, ता. गंगापुर, जि. संभाजी नगर यास ताब्यात घेवुन अटक केले होते. त्यानंतर आरोपी क २) सुनिल विठठल पिंपळे वय ५० रा गुरु धानोरा ता. गंगापुर जि.छ. संभाजी नगर यास अटक करण्यात आली होती.
केलेल्या तपासात पथकाला सदर गुन्हयातील मुख्य आरोपी विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे वय ४० वर्ष रा. ग्राम वझर ता गंगापुर जि.छ. संभाजी नगर हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर गुन्हयातील सोने व डायमंड या दागीन्याची त्याने विक्री केल्या बाबत माहीती प्राप्त झाल्याने त्यास अटक करणे कामी पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी नमुद गुन्हयातील मुख्य फरार आरोपी याचा शोध घेवुन गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करणेसाठी पोउपनि गोपाल जाधव व पोलीस अमलदांर पथक गठीत केले.
त्यानंतर नमुद पथकाने सदर गुन्हयाचा तपास करून तांत्रीक बाबीचा व गोपनीय माहीतीचे आधारे गुन्हयातील मुख्य आरोपी नामे विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे वय ४० वर्ष रा. ग्राम वझर ता गंगापुर जि.छ. संभाजी नगर यास बिहार राज्यातुन अटक करून गुन्हा करते वेळी वापरेलेले हायड्रोलीक कटर, टामी, मोठे पेचकस व इतर साहीत्य तसेच गुन्हयातील चोरी गेलेला मुददेमाल पैकी २५,००,०००/-रू चा मुददेमाल हस्तगत केले.
- सदर पथक हे गुन्हयातील आरोपी शोध कामी गुन्हा घडल्यापासुन सलग ७८ दिवस गुन्हा उघडकीस आणणे करीता परीश्रम घेत होते.
- सदर तपास पथक हे आरोपी शोध करीता ०३ राज्य (बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश) जावुन आरोपीचा शोध घेतला.
- सदर गुन्हयात तपास पथकाने आरोपी शोध कामी ०५ राज्यात एकुण ७ हजार किलो मीटर चा प्रवास केला