अकोला. पक्ष निरीक्षक जावेद अन्सारी,महाराष्ट्र काँग्रेस कमेटी सरचिटणीस धनंजय देशमुख यांनी अकोल्याला येऊन महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमेटी ने दिलेल्या कार्यक्रमानुसार २ टप्प्यात बैठकी घेऊन कार्यकर्त्यांची विजया बाबत भूमिका जाणून घेतली. यामध्ये काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवीण्यासाठी बूथ, ब्लॉकनिहाय मिटिंग घेऊ तसेच , जन हिताच्या मुद्द्यावर आंदोलने आणि शिबिरे घेऊ असे आश्वासन महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अकोला महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे यांनी स्वराज्य. भवन येथे आयोजित बैठकीत दिले.
येणाऱ्या विधानसभे संदर्भात आज २३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ,यामध्ये पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आलेल्या कार्यक्रमानुसार मतदार याद्या अद्यावत करणे, राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या जनविरोधी निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारने घेतलेले निर्णय कसे जनता विरोधी आहे हे दाखविण्यासाठी आंदोलने आणि ,जनजागृती करून काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवीण्यासाठी , शहर, वार्ड,,ब्लॉक स्तरावर मिटिंग घेऊ , सरकार विरोधी आंदोलने करू ,आणि जन हितासाठी विविध विषयांवर शिबिरे घेऊ असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेस कमेटी महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बैठकीत पक्ष निरीक्षकांना दिला आहे.
याच बैठकीला माजी मनपा विरोधीपक्षनेते साजिदखा पठान, महाराष्ट्र काँग्रेस कमेटी सचिव. प्रकाश तायडे, माजी महापौर मदन भरगड, माजी आमदार बबनरावं चौधरी, अविनाश देशमुख, महेंद्र गवई, डॉ झिशान हुसैन, कपिल रावदेव, पराग कांबळे, तश्वर पटेल,नगरसेवक जमीर, गौतम गवई, डॉ शफिक अहमद, अनुजा शहा, जैनबी यांनी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवीण्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी आणखी काय काय करण्याची गरज आहे याबाबत आपल्या सूचना मांडल्यात. यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात साजिद खान पठाण सह २५ कार्यकर्त्यांनी उमेदवारी घेतली असल्याचे सांगत पक्ष जो उमेदवार निश्चित करेल त्याला सर्वांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.