‘पूर्णे’काठच्या गावांना इशारा
अकोला, दि. 16 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात आज सरासरी 15 मिमी पावसाची नोंद झाली. बार्शिटाकळी तालुक्यात अतिवृष्टीने 15 गावांतील पिकांचे नुकसान झाले.
बार्शिटाकळी तालुक्यात सरासरी 39.6 मिमी पाऊस झाला. त्यात बार्शिटाकळी मंडळात 95 मिमी व राजंदा मंडळात 65 मिमी पाऊस झाला. या तालुक्यात 15 गावांतील सुमारे 1 हजार 304 हे. क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले.
अकोला तालुक्यात 19.4 मिमी, अकोट तालुक्यात 6.8 मिमी, तेल्हारा तालुक्यात 11.7 मिमी, बाळापूर तालुक्यात 3.8 मिमी, पातूर तालुक्यात 13.7 मिमी, मूर्तिजापूर तालुक्यात 9.8 मिमी पाऊस झाला.
‘पूर्णे’काठच्या गावांना इशारा
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे 10 सेंमी एवढे उघडण्यात आले असून, 13.88 घ.मी. प्र. से. एवढा विसर्ग पूर्णेच्या पात्रात होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.