अकोला. १३.०२.२०२४
आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा गटप्रवर्तक २ हजार भाऊबीज बोनस तसेच आशा कर्मचारी यांना ७ हजार व गटप्रवर्तक यांना १० हजार केलेल्या मानधन वाढीचा शासन आदेश जी आर. मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदानाच्या बाहेर पडणार नाही, असा निर्धार महाराष्ट्रातील ३५ हजारपेक्षा जास्त आशांनी केला असल्याची माहिती आयटकचे राज्य कोन्सील सदस्य कॉ. नयन गायकवाड यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी त्यांना निवेदन देण्यासाठी ३५ हजारांपेक्षा जास्त आशा मुंबई ठाणे येथील मुख्यमंत्री यांच्या घरावर कॉ. राजू देसले, कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुमन पुजारी, कॉ. शंकर पुजारी, कॉ. विनोद झोडगे, कॉ. बुरुड का. संजय नागरे, कॉ. पानसरे, कॉ. प्रफुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात जमल्या होत्या, तेव्हापासून आंदोलन सुरू आहे. नंतर महिलांची गैरसोय थांबावी म्हणून है आंदोलन आझाद मैदान सुरु करण्यात येवुन आझाद मैदान येथे पोलीस छावनीचे स्वरूप आले असून जिल्ह्यातून ७०० पेक्षा जास्त आशा व गट प्रवर्तक कर्मचारी आझाद येथे आंदोलनात सहभागी झाल्या आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आरोग्य मंत्री हे जोपर्यंत शासन आदेश मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील आशांचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कॉ. नयन गायकवाड, करीत आहे.
त्यामुळे हजारो आशा कर्मचारी आझाद मैदान येथे ठिय्या मांडून बसल्या आहेत. हिच संख्या रोज वाढत असल्याने शासनाने लवकर निर्णय घ्यावा. जोपर्यंत जी.आर.ची अंमलबजावनी होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे आयटक पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. अहमदनगर जिल्ह्यातून मिनाक्षी कारले, मंदाकिनी, आगरकर, वंदना सिरसाट, मिनाक्षी भगत, रेखा ताई, पुनम खोबरागड़े, शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी आंदोलनात उपस्थित आहेत व राज्यातील ७२ हजारवर आशा गटप्रवर्तक उपस्तीत राहतील.