अकोला शहराची शोभा वाढावी या उद्देशाने जिल्हाधिकारी अजित कुंभार व मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या संकल्पनेने जिल्हाधिकारी कार्यालय ते सरकारी बगीचा प्रयन्त बोलक्या भिंतीचे उदघाटन महसुल तथा अकोला जिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, महानगरपालिका प्रशासनाने तब्बल 85 लाख रुपये खर्च करून सदर रस्ता सुशोभिकरण केला आहे,
या मध्ये अकोला जिल्याचे वैभव दाखवणारी म्युरल वॉल उभारणी करीत रात्रीला सुंदर दिसणारे कारंजे सुद्धा लावण्यात आले आहे, तसेच 6 फुटाचा गरुडाचे पुतळा, विविध प्रजातीचे फुलांची झाडे, उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी उपलब्द व्हावे या करिता विभिन्न रंगाची छत्री व प्रकाश पाडणारे खरुताचे पुतळे लावण्यात आले आहे,
आज झालेल्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हापरिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, महानगरपालिका चे उपायुक्त यांच्या सह इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्युरल वॉल ची पाहणी करीत महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले, आगामी काळात अकोला शहरात साकारण्यात आलेली म्युरल वॉल ही नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे, सदर म्युरल वॉल ला अशोभीत करणाऱ्या खोडंसळ व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यासाठी या ठिकाणी cctv कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहे.