ता.प्र.गुफरान शेख )
बार्शीटाकळी: तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टिटवा गावात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. वृत्त असे की पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टिटवा येथील पोलीस पाटील यांनी पिंजर पोलीसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशाप्रकारे आहे की वरील नमुद घटनेच्या वेळी व ठिकाणी फिर्यादी हे गावात असतांना, गावातील नागोराव कडणाजी गावंडे यांनी त्यांचे जवळ येवुन सांगीतले की आज दि.०९ फेब्रुवारी रोजी ११:०० वाजता अकोला येथुन घरी आले. व लोखंडी गेटचे कुलुप उघडुन आतमध्ये गेले असता, बेडरूम मध्ये त्यांचा मुलगा संदीप नागोराव गावंडे वय 25 वर्षे हा मृत अवस्थेत दिसला असल्याचे सांगीतले. त्यावरून फिर्यादी हे नागोराव गावंडे
सोबत त्यांचे घरी गेले तेव्हा संदीप गावंडे वय 25 वर्षे हा मृत अवस्थेत दिसला. त्याचे दोन्ही हात, दोन्ही पाय बांधलेले होते. मानेवर काळसर वळ होते म्हणुन पोलीसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी येवुन पंचनामा करून प्रेत शव विच्छेदना करीता पाठविले. नागोराव गावंडे यांचा मुलगा संदीप गावंडे याचे हातपाय बांधले असल्यामुळे व गळ्यावर काळसर वळ असल्याने, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यास ठार मारले आहे अशा रिर्पोट वरून गुन्हा नोंद करून, सदर गुन्हयाचा पुढील तपास ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू मेश्राम
मृतकाचे वडील नागोराव कडनाजी गावंडे वय ६० व भाऊ प्रदीप नागोराव गावंडे वय ३२ हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरूध्द भां.द.वि. नुसार ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल केला. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यांना १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. अशी सूत्रांची माहिती आहे.