- महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची शनिवारी आमसभा
- पत्रकार निवास प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी,
नवीन नोंदणी करणार : पुरुषोत्त आवारे पाटील
अकोला : तानुबाई बिर्जे पत्रकारदिनानिमित्त महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रगतीपथावर असलेल्या पत्रकार निवास प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून नवीन नोंदणी करण्यात येणार आहे, तरी समस्त पत्रकार बांधवानी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील
यांनी केले आहे
तानुबाई बिर्जे पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची वार्षिक आमसभा शनिवार दि. ६ जानेवारी २०२४, वेळ-दुपारी १२:०० वाजता स्थळ : ‘लोटस पार्क’ पत्रकार निवास, हनुमंत विद्यालय समोर एम आय डी सी रोड, शिवणी अकोला येथे
आयोजीत केली आहे. यावेळी प्रगतीपथावर असलेल्या पत्रकार निवास प्रकल्पची पाहणी करून नवीन नोंदणी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ध्यक्षस्थानी अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील, विशेष अतिथी म्हणून प्रा. सुभाष गादीया जेष्ठ पत्रकार, दिनेश शुक्ला जेष्ठ पत्रकार, तर प्रमुख उपस्थिती म्हणून अॕड. सुधाकर खुमकर, प्रदेश सरचिटणीस, विठ्ठल महल्ले, विभागीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत होत आहे.जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनिल माहोरे,जिल्हाध्यक्ष, बहुजन पत्रकार संघ,जावेद झकरीया,सरचिटणीस, बहुजन पत्रकार संघ,निरज आवंडेकर,कार्याध्यक्ष, बहुजन पत्रकार संघ यांनी केले आहे.