एक आठवड्यात तीन अजगरांना जीवनदान
निंबा फाटा येथून जवळच असलेल्या बहादूर या गावात सरपंच अंकुश चोपडे यांचा निदर्शनास भलामोठा साप आले असता त्यांनी वन्यजीवसंस्था चे सदस्य दत्ता मेसरे,दीपक केकान, विक्की खणके यांना साप असल्याची माहिती दिली. त्यानी ही माहिती वन्य जीव संवर्धन संस्था च्या सदस्य प्रतिभाताई ठाकरे यांना दिली असता.
त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठले तेथे पोहोचतात त्यांनी पाहणी केली असता त्यांना हा पाच फूट लांबीचा साप असून हा अजगर आहे असं निर्देशनात आले असता त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शितापीने या सापास जोरबंद केले व या सापा बद्दल गावकऱ्यांना माहिती देताना सांगितले हा अजगार साप पूर्णपणे बिनविषारी आहे घोणस व अजगर या सापांमध्ये साम्य असून या दोन्ही सापांचे निरीक्षण केले असता त्यामध्ये फरक जाणवतो घोणास सापाची अधिकतम लांबी पाच फूट एवढी असते.व तो पूर्णपणे विषारी आहे.
भारतात सर्वात जास्त सर्पदंश हे घोणस या सापाने होतात. तसेच अजगर हा साप पूर्णपणे बिनविषारी असून.या सापाची लांबी घोणस या सापापेक्षा अधिक असते.या सपाची लांबी ही पंधरा फुटापर्यंत होते या सापाच्या भक्षात उंदीर पासून ते वाघापर्यंत हा भक्ष करू शकतो.हा साप कायद्याअंतर्गत आरक्षित शेडूल एक मध्ये येतो हा साप दुर्मिळ होत असल्यामुळे या सापाचे रक्षणार्थ वन्यजीव संस्था ही अहोरात्र कार्य करत.
असून अजगर साप आढळल्यास त्याला न मारता जवळील सर्पमित्रांशी संपर्क साधावा अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सदर अजगराला रेस्क्यू करताना वन्यजीव संस्थेचे सहकारी उपस्थित होते व तसेच वनविभागाचे अधिकारी श्री इंगळे साहेब,तायडे साहेब व वन्यजीव रक्षक बाळ काढणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सापास पकडण्यात आले.
तसेच वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले. यावेळी वन्यजीव संस्था सदस्य दत्ता मेसरे, विक्की खणके, दीपक केकान,नितीन ठाकरे,जगदीश रेवतकर वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.