एकाच ठिकाणी आढळले 2 अजगर साप

प्रतिभाताई ठाकरे यांच्या प्रयत्नाने 2 अजगरांना जीवदान

पारस इथून जवळच असलेल्या ग्राम कसुरा गावां लगतच श्री अभिमन्यू ताथोड यांच्या शेतामध्ये त्याचा पत्नी सह काही ग्रामस्थ महिला शेतकाम करत असताना तेथील मंदिरात दोन भलेमोठे साप असल्याचे त्यांचा निदर्शनास आले असता. त्यांनी शेतकरी अभिमन्यू ताथोड यांना माहिती दिली.


असता त्यांनी पारस येथील वन्यजीव संस्था चा सदस्य प्रतिभा ताई ठाकरे यांना शेतात साप असल्याची माहिती दिली.क्षणाचाही विलंब न करता प्रतिभाताई ताई सह वन्यजीव संस्था चे सहकारी विनय शर्मा हे तिथे पोहचले व पहाणी केली असता शेतातील महादेवाचे मंदिरात त्यांना दोन अजगर हे आढळून आले.


यावेळी त्यांनी साप पकडण्यासाठी जवळ जाताच क्षणी त्यातील एक साप जवळच लागून असलेल्या पराटी (कपाशी) चा शेतात वाळलेल्या काळ्याचा ढिगारात जाऊन बसला यावर विनय शर्मा यांनी पाळत ठेवली व मंदिरात असलेला एक साप प्रथमता प्रतिभा ठाकरे यांनी मोठया शिताफीने पकडला.


त्यानंतर त्यांनी काडयाचा ढिगारात लपून बसलेल्या दुसऱ्या सापाला पण पकडले यावेळी त्यांना विनय शर्मा यांचे सहकार्य लाभले.
सर्पमैत्रिन प्रतिभाताई यांनी माहिती देत सांगिले की, या सापाची अधिकतम लांबी पंधरा फूट एवढी असते व हा साप पाणथळ जागा पसंद करतो हा साप वाघापासून तर उंदरापर्यंतची शिकार करू शकतो हा एवढा मोठा असून पण पूर्णपणे बिनविषारी असतो. घोणस व अजगर साप दिसायला जरी सारखे असले तरी जवळून निरीक्षण केल्यास लक्षात येते की घोणस या सापाची लांबी अधिकतम साडेचार ते पाच फूट असते आणि अजगर सापाची लांबी अधिकतम पंधरा फूट एवढी असते रंगसंगती ह्या विविध प्रकारच्या असतात त्यांच्या शरीरावरील डिझाईन यामध्ये फरक असतो घोणस साप हा विषारी असून अजगर हा पूर्णपणे बिनविषारी असतो. अजगर व घोणस या दोघांचे मिलन काळ थंडीच्या दिवसांमध्ये असते त्यामुळे दोन्ही साप थंडीच्या दिवसात अधितम आढळून येतात अजगर या सापाला घोणस समजून भीतीपोटी शेतकरी त्याना मारून टाकतात अजगर हा साप दुर्मिळ असून वन्यजीव कायद्यात अजगर या सापाला परशिस्ट “अ” श्रेणी प्राप्त असून हा साप मारणे कायद्याने गुन्हा आहे.


या सापाच्या संरक्षणासाठी वन्यजीव संस्था पारस ही तत्पर आहे साप आढळल्यास त्याला न मारता हा साप आढळल्यास जवळील सर्पमित्रराना संपर्क साधावा अशी विनंती प्रतिभाताई ठाकरे यांनी केली. आम्ही या सापाला वाचवण्यासाठी व याला संरक्षण देण्यासाठी सदैव तत्पर आहोत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली या दोन्ही सापांना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू करण्यात आले व लगेचच वनपरिक्षेत्रात त्याला मुक्त सुद्धा करण्यात आले यावेळी वनविभागाचे अधिकारी वनपाल श्री इंगळे साहेब,श्री तायडे साहेब, व मनद जीव रक्षक बाळ काळणे तथा वन्यजीव संस्थेचे पदाधिकारी जगदीश भाऊ रेवतकर, विनय कुमार शर्मा,अनवर दादा अंसारी, दीपकभाऊ लोड,हरीश तायडे,अक्षय गाडगे, प्रमोद रोहनकर,प्रशांत दंदी व नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW