(समीर खान)
अकोला:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या अकोला महानगर अध्यक्षपदी पुन्हा वसीम खान यांची निवड करण्यात आली. वसीम खान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या महानगर अध्यक्ष पदावर कार्यरत होते. वसीम खान यांचे मागील उत्कृष्ट कामगिरी पाहता माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शिफारशीनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांनी वसीम खान यांना अकोला महानगर अध्यक्षपदाची पुन्हा जबाबदारी सोपवली आहे.

वाशिम येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यक्रमात वसीम खान यांची अल्पसंख्यांक विभागाच्या अकोला महानगर अध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे जावेद हबीब यांनी माननीय अनिल देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला महानगर कार्यकारी अध्यक्ष सैय्यद युसुफ अली, प्रदेश महासचिव प्रा. विश्वनाथ कांबळे, महानगर उपाध्यक्ष शौकत अली शौकत,महानगर उपाध्यक्ष निसार खान, अकोला विधानसभाअध्यक्ष अल्ताफ खान, योगेश सोनोने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशिम जिल्हा अध्यक्ष बाबारावजी खडसे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे, सुनील पाटील, मो.अनस यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वसीम खान यांनी आपल्या नियुक्ती बद्दल सर्व मान्यवराचे आभार मानले व पक्ष बळकट करण्यासंदर्भात विश्वास व्यक्त केला.
