अग्निशमन दलाच्या कर्मचारी प्रदिप तायडे यांची तत्परता

(समीर खान)
अकोला – नावजी जांभरुण ता. जिल्हा वाशिम येथिल सुमित्रा पवार या गर्भवती महिलेला बि पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची अत्यंत गरज होती. या महिलेचे नातेवाईक सुभाष चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांना फोन करून सुमित्रा पवार या गर्भवती महिला रुग्णाचे सिझर झाले असून बि पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रक्ताची अत्यंत गरज आहे आपण मदत करावी अशी विनंती केली.

सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांनी क्षणांचाही विलंब न करता आपले मित्र व अकोला अग्निशामक विभागात कार्यरत असलेले कर्मचारी प्रदिप तायडे यांना रक्तदान करण्यासाठी विनंती केली. प्रदिप तायडे हे आपल्या ड्यूटी वर कर्तव्य बजावत असतांना क्षणाचाही विलंब न करता सर्वोपचार रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेले. व रक्तदान करून त्या महिला रुग्णांला मदत केली. ड्युटीवर आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने सदर महिला रुग्णाला रक्तदान करून खूप मोठे कार्य पार पाडले. अग्निशामन विभागात स्वतःचे जीवाची परवा न करता ईतरांचे जिव वाचवणाऱ्या प्रदीप तायडे यांनी रक्तदान करून एक महिला रुग्णाला रक्तदान करून जीवनदान देण्याचे महान कार्य केल्या बद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे व प्रदिप तायडे यांचे आभार मानले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW