प्रतिभा ठाकरे यांनी दिले साप जीवनदान
बाळापूर तालुक्याचे अंतर्गत येणाऱ्या देगाव मानकी चाराच्या गोदामात आढळून आला 10 फूट लांब साप
देगाव मानकी येथील संजय रामराव पल्हाडे यांचे शेतातील चारा च्या गोदामात शेतात काम करीत असताना त्यांना अचानक भलामोठा साप त्यांचा निदर्शनास आला. त्या एकदम भयभीत झाल्या.त्यांनी लगेच बाजूचा गावकरी व काम करणारे लोकाना मदतीसाठी हाक मारली तेथील ग्रामस्थांनी यांनी लगेच पारस येथिल वन्यजीव संस्था सदस्या तथा सर्पमैत्रिण प्रतिभा ठाकरे यांना कॉल करून शेतात भलामोठा साप असल्याची माहिती दिली.

यावेळी संजय रामराव पल्हाडे व त्यांचा सहकार्यानि सापावर पाळत ठेवली प्रतिभा ठाकरे ह्या क्षणांचाही विलंब न करता त्या तिथे पोहचल्या.त्यांनी या सापाला मोठ्या शिताफीने रहा फूट लांब सापाला त्यांनी यावेळी पकडले व त्यांनी या सापाबद्दल माहिती देत सांगिले की हा धामन जातीचा साप असून याची अधिकतम लांबी ही 12 फुटापर्यंत होत असून हा साप शेतात उंदीर खाण्यासाठी येत असतो आहे तसेच हा साप पूर्णपणे बिनविषारी असून हे साप हा साप झाडावर जमिनीवर विठाच्या ढिगाराखाली व लाकडाच्या ढिगाराखाली सहजरीत्या राहू शकतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी देगाव तील गावकऱ्यांना दिली या सापाला वनविभाचे अधिकारी गजानन इंगळे सर, तायडे साहेब व बाळ काढणे सर यांचा मार्गदर्शना खाली पकडण्यात आले असून त्याला पातूर वन विभागात सोडण्यात आले यावेळी वनविभागाचे कर्मचारी तथा वन्यजीव सदस्य आदि उपस्थित होते
