भव्य मोफत आरोग्य शिबिर: समितीचे पदाधिकारी व प्रशासनाने अकोला वैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली

अकोला: एकही रुग्ण तपासणीशिवाय त्याचा समाधान झाल्याशिवाय त्याला उपचार झाल्याशिवाय अकोला मेडिकल कॉलेज मेडी व जिल्हा रुग्णालय इथून आरोग्य शिबिरातून जाता कामा नये या दिशेने कामाला लागून डॉक्टर मंडळींनी सहकार्य करावे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जात-पात पक्ष भेद,मन भेद विसरून मोफत आरोग्य शिबिराचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती आमदार व अकोला मेडिकल कॉलेजचे अभ्यासगत समितीचे अध्यक्ष रणधीर सावरकर यांनी केली.


इतिहासामध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर होत असून या शिबिराचा लाभ अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना मिळून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ञ मंडळी सज्ज झाली असून राज्यातील त्रिबल इंजन सरकार भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात करत असून या शिबिरात च्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस येत असून त्यांच्या स्वागतासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज झाले असून आज मेडिकल कॉलेज परिसराचा अभ्यासगत समिती पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा पोलीसअधिक्षक घुगे, कॉलेज डिन मीनाक्षी गजभिये, जिल्हा सल्ले चिकित्सक श्रीमती तरंग तुंग वारे समितीचे पदाधिकारी अनुप धोत्रे, भाजपा नेते विजय अग्रवाल जयंत मसने समितीचे सदस्य गिरीश जोशी, डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर अमित कावरे देवाशिष काकड डॉक्टर शंकरराव वाकोडे डॉक्टर अभय जैन उज्वला धबाले, मोहन पारधी अकोला मेडिकल कॉलेजचे अधिकारी तसेच विविध विभाग प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करून आरोग्य शिबीर भावी व्हावा या दिशेने गती देण्याचं काम केलं मंडप उभारणीचं काम तसेच वेगवेगळ्या व्यवस्था संदर्भातील पाणी याचा सगळा आढावा आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला लेडी हार्डिंग च्या समितीचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा लेडीज आणि स्टॉप संपूर्णपणे मदत करण्याचे अभिवचन दिले आहे तसेच शहरातील विविध डॉक्टर्स आरोग्यसेवा सेवा विविध सामाजिक कार्यकर्ते रोटरी लायन्स राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना चे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून अकोला च्या वैभव घालण्यासाठी 500 बेडचा जिल्हा सामान्य रुग्णालय चा भूमिपूजन अकोला येथील मेडिकल कॉलेज चा विस्तारीकरण इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच बोरगाव येथे ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचे भूमिपूजन व राज्यातील दुसरे डबल मधली इमारतीचे भूमिपूजन होणार आहे तसेच अकोला शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शहीद होणारे 1952 पासून आतापर्यंत झालेल्या सैनिक यांचे स्मारकाला अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्यांचे अनावरण त्यांना नमन तसेच या मेडिकल कॉलेजला होणारा सात तारीख आठ तारखेला आरोग्य मेळाव्यात मेरी माती मेरा देश या कार्यक्रमांतर्गत सगळ्यात रुग्णांनी आपापल्या भागातील पवित्र माती आणून तिथे ठेवण्यात येणाऱ्या भांड्यामध्ये माती अर्पण करावी दिल्ली येथे विश्वातील सर्वात सुंदर अमृत उद्यान होणार असून त्यामध्ये आपल्या भागातील पवित्र मातीच्या माध्यमातून शहिदांना नमन करण्यासाठी होणारा शहीद स्मारक परिसरात होणाऱ्या उदाहरणात ही माती जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या हॉस्पिटलला सात आणि आठ तारखेला येणाऱ्या सर्व नागरिकांनी त्या आपल्या भागातील पवित्र माती येऊन तिथे अर्पण करावी जे केंद्र सरकारला पाठवण्यात येईल अशी ही आव्हान आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


जिल्हाधिकारी अजित कुंभारे व जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे यांनी परिसराची पाहणी करून अनेक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या व पूर्वतयारीचा आढावा घेतला सुरक्षेच्या दृष्टीने तसेच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या आरोग्य शिबिरात सर्वांना लाभ होण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे 2018 मध्ये धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली 19 हजार रुग्णांची तपासणी करून त्यांचा उपचार सहा महिने पर्यंत करण्यात आला व अनेक रुग्णांना याचा लाभ मिळाला अशी माहिती यावेळी देण्यात आली त्याच धर्तीवर हा आरोग्य शिबीर होत आहे या दृष्टीने वेगवेगळ्या 45 समित्या गठीत करण्यात आले आहे व वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले असून नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने चौकशी केंद्रापासून तर वेगवेगळे विभागाची निर्मिती जबाबदारी देण्यात आली आहे संत गजानन महाराज संस्था यांनी भोजनाची व्यवस्था चा यजमानपद स्वीकारलेला आहे त्यांचे सुद्धा अभिनंदन व आभार आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे गजानन महाराजांचा प्रसाद रुग्णांना मिळणार आहे त्यामुळे भक्ती आणि श्रद्धा सोबत मानवतेचे कार्य सुद्धा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी अनेक सूचना अभ्यासगत समितीने दिल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW