अकोला, दि. ५ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी येथील असदगड, तसेच रेल्वे स्थानक परिसरात नुकतीच स्वच्छता मोहिम राबवली .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षानिमित्त, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्यात गडकिल्ले स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
अकोला येथील असदगढ या पुरातन किल्ल्यावर स्वच्छता करण्यात आली. अभियानाच्या नियोजनाकरिता संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे साहेब यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसेच इतरही व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मुलींनी उस्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेऊन किल्ल्याची स्वच्छता केली.
यावेळी संस्थेच्या गटनिदेशिका रेखा रोडगे, ज्येष्ठ शिल्पनिदेशक प्रशांत बोकाडे, भालचंद्र दिगंबर तसेच संस्थेचे शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर आणि मुख्य लिपिक जयंत गणोजे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बोकाडे यांनी केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
स्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी जयंत गणोजे, प्रशांत बोकाडे , भालचंद्र दिगंबर , अरविंद पोहरकर , विनोद वेरूळकर , शुभांगी गोपणारायन, एन. पी. पन्हाळकर, , वृषाली सावरकर , लक्ष्मण जठाळ ,सौ. मनोरमा भारसाकळे, सौ. वीणा लाड , निवेदिता माणीकराव , सोनल कुलकर्णी, सौ . किशोरी फुके, , बी.एस. बोदडे, मयुरी बासोडे , प्रवीण जुमळे, आशिष इधोळ , गजानन गावंडे ,पी. जी. डांगटे , भाग्यश्री इंगळे, नंदकिशोर मासोदकर व इतर सर्व कर्मचारी वृंद यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले.
स्वच्छता मोहीम तथा पंधरवडा मोहीम दरम्यान दीक्षांत समारंभ तसेच पीएम रन्स स्किल , गढ किल्ला स्वच्छता अभियान व इतर उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी सर्व कर्मचारी वृंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.