मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

अकोला, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदानातील शहरी अनास्था लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

पुनरीक्षण पूर्व कार्यक्रमात मतदान केंद्र सुसुत्रीकरण, पुनर्रचना, कंट्रोल चार्ट अद्ययावत करणे ही कामे दि. 22.8.2023 ते 9.10.2023 या कालावधीत, तसेच नमुना 1 ते 8 तयार करणे, दि. 1.10.2024 या अर्हता दिनांकावर पुरवणी व एकत्रित प्रारूप मतदार याद्या तयार करणे ही कामे दि. 10 ते 26 ऑक्टोबरदरम्यान केली जातील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर यांनी दिली.

पुनरीक्षण कार्यक्रमात दि. 27 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 27 ऑक्टोबर ते दि. 9 डिसेंबर असा आहे. विशेष मोहिमेच्या तारखा मुख्य निवडणूक अधिका-यांकडून जाहीर करण्यात येतील. दावे व हरकती दि. 26 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येतील. भारत निवडणूक आयोगाची मान्यता घेणे, डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी मतदार याद्यांची छपाई करणे ही कामे दि. 1 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होतील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दि. 5 जानेवारी 2024 रोजी करण्यात येईल, असे श्री. परांडेकर यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणूका, तसेच मतदानामधील शहरी अनास्था विचारात घेता भारत निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करताना विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाच्या कालावधीत ग्रुप सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच उंच इमारती असलेल्या शहरी भागांमध्ये सदर गृहनिर्माण संस्था, इमारतीच्या आवारातील तळमजल्यावर असलेली सामान्य सुविधा केंद्रे, समाज केंद्रे, शाळा यामध्ये मतदान केंद्रे उपलब्ध करून देता येतील. तसेच प्रयत्न शहरी भागातील झोपडपट्टी समूहांमध्येही करण्याबाबत आयोगाने सूचित केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW